श्रीरंग आप्पा बारणे यांनी आपली राजकीय वाटचाल १९९७ साली पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेवक म्हणून सुरू केली. १९९९ साली त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले. त्यानंतर अनेक वेळा नगरसेवक म्हणून निवडून येत त्यांनी विरोधी पक्षनेते आणि शिवसेना गटनेते म्हणून प्रभावी भूमिका बजावली. २०१४ साली ते राष्ट्रीय राजकारणात दाखल झाले आणि १६व्या लोकसभेसाठी खासदार म्हणून निवडून आले. २०१९ मध्ये १७व्या लोकसभेसाठी पुनः एकदा जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची दुसऱ्यांदा निवड केली. २०२४ साली ते सलग तिसऱ्यांदा १८व्या लोकसभेसाठी खासदार म्हणून निवडून आले. खासदार म्हणून त्यांनी ऊर्जा, संरक्षण, अर्थसंकल्प, पर्यटन व संस्कृती अशा देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या संसदीय समित्यांवर कार्य केले. त्यांच्या संसदेतील उल्लेखनीय आणि सक्रिय कामगिरीसाठी त्यांना 'संसदरत्न पुरस्कार', 'विशेष संसदरत्न पुरस्कार' तसेच 'संसद महारथी पुरस्कार' यांसारखे अनेक प्रतिष्ठित राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले आहेत.
सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी पारदर्शक, उत्तरदायी आणि विकासाभिमुख नेतृत्व निर्माण करणे. मावळ लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास घडवून आणणे आणि प्रत्येक घटकापर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचवणे
मावळ लोकसभा मतदारसंघाला शाश्वत, समृद्ध आणि सक्षम बनवणे - जिथे नागरी सुविधा, शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि पर्यावरण यांचा समतोल विकास साधला जाईल. युवकांना सक्षम बनवणं, महिलांना संधी देणं, आणि शेवटच्या घटकाच्या सशक्तीकरणासाठी सातत्याने कार्यरत राहणं, हीच माझी दूरदृष्टी आहे
© 2025 Shrirang Appa Barne. All rights reserved.